
जरांगे म्हणाले की, इच्छुकांची होत असलेली गर्दी हा आक्रोश आहे, ही आक्रोशाची लाट आहे. ही लाटच विजयाकडे नेणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता मराठा समाजाशी चर्चा करूनच निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. मराठा आरक्षण मागतो म्हणून आम्ही जातीयवादी नसून आम्ही सगळ्या जातीचेच काम करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भेटीवर जरांगे म्हणाले की, आता चर्चा करून काय उपयोग. ज्यावेळी निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी तयारी दर्शवली. तर काहींनी निवडणूक लढविण्याबाबत नकारात्मकता दर्शवली.