Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Anandacha Shidha : निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा!

Anandacha Shidha : निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा!

राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप


अमरावती : विधानसभेची आचारसंहिता (Code Of Conduct) लागू झाल्याने रेशन दुकानातून आनंदाचा शिधा मिळणार का असा संभ्रम नागरिकांमध्ये होता. मात्र आंनदाच्या शिधाची पिशवी वगळून शिधामधील संपूर्ण रेशन कार्ड धारकांना मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे.


दोन महिन्यात ५ लाख २७ हजार ३४२ लाभार्थ्यांपैकी ३ लाख १७ हजार ७४३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. तर उवर्रीत २ लाख ९ हजार ५९९ लाभार्थ्यांना किट वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. सणासुदीत रेशनकार्ड धारकांना शासनाकडून केवळ शंभर रूपवात आनंदाचा शिधा दिला जाते. यामध्ये १ किलो साखर, १ किलो तेल, १ किलो, रवा व १ किलो हरभरा दाळीचा समावेश आहे. गणेश चतुर्थी निमित्य नागरीकांना या आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु प्रत्यक्षात गणेश उत्सव झाल्यानंतर आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या उत्सवाचा शिधा वाटप सुरू असतानाच मंगळवारी विधानसभेची आचारसंहीता लागू झाली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या पिशवीमध्ये आनंदाचा शिधा वाटप केल्या जातो. त्यामुळे विधानससभेच्या निवडणुकीची आचारसंहीता सुरू असल्याने हा शिधा वाटप होईल का असा संभ्रम नागरीकांमध्ये निर्माण झाला होता. परंतु यावर पर्याय काढत त्या राजकीय पिशवीविनाच कार्डधारकांना शिधामधील साहीत्य देण्यास काही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे.


जिल्ह्यात ५ लाख २७ हजार ३४२ आनंदाचा शिधाचे लाभार्थी असुन सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महीन्यात ३ लाख १७ हजार ७४३ शिधाचे वाटप करण्यात आले आहे. प्रतिक्षेत असलेल्या २ लाख ९ हजार ५९९ लाभार्थ्यांना या किटचे वाटप त्या राजकीय पिशवीविना सुरू आहे. दिवाळीचा शिधा मात्र अप्राप्त सद्या सुरू असलेला आनंदाचा शिधा वाटप हे गणेशउत्सवाकरीता आलेले आहे. जिल्ह्याला ते दशीरा प्राप्त झाल्याने अद्यापही अर्ध्या रेशनकार्ड धारकांना या शिधाचे वाटप झाले नाही. परंतु १५ दिवसांवर दिवाळी सण असुन याचे धान्य आणि शिधा अद्यापही अप्राप्त आहे. त्यामुळे दिवाळीची शिधा केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment