Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीRailway Block : रविवार, सोमवार कसारा स्टेशनवर विशेष ब्लॉक !

Railway Block : रविवार, सोमवार कसारा स्टेशनवर विशेष ब्लॉक !

प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ लाईन्सच्या विस्ताराच्या कामाला वेग

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) कसारा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ लाईन्सच्या विस्तारासाठी आणि रुंदीकरणासाठी कसारा स्टेशनवर एनआई कामांसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी ३.२० ते सोमवार सकाळी १.२० वाजेपर्यंत २२ तासांचा असेल.

या ब्लॉकचा कालावधी डाऊन लाइन रविवार १०.४० ते दुपारी १.४० वाजेपर्यंत (३ तास) आणि अप लाईन रविवार दुपारी १२. ४० वाजता ते दुपारी १. ४० वाजता (रविवार) (१ तास) आणि अप आणि डाउन लाईन्स एकत्रित रविवारी संध्याकाळी ७.२० वाजेपासून सोमवारी सकाळी १. २० वाजेपर्यंत (६ तास) असेल.

रविवारी धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्स्प्रेस गाड्या रद्द राहतील. नागपूर-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस शनिवारी नाशिक रोड येथे रद्द होइल व जबलपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस शनिवारी मनमाड येथे संपेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम रविवारी नाशिक रोड येथून संध्यकाळी ६. ३० वाजता सुटेल व ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नाशिक रोड दरम्यान रद्द होईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर गरीबरथ एक्सप्रेस रविवारी मनमाड येथून संध्याकाळी ५.५५ वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मनमाड दरम्यान रद्द होईल. बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस , अमृतसर-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, गोरखपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस कुशिनगर एक्सप्रेस, जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस छपरा – पनवेल विशेष, शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस, शनिवारी जळगाव – नंदुरबार- भेस्तान – वसई रोड मार्गे वळवल्या जातील.

या ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम

  • रविवारी ८ सेवा रद्द केल्या जातील.
  • २२ सेवा योग्य स्थानकांवर अल्पावधीत बंद होतील.
  • २२ सेवा योग्य स्थानकांवर कमी होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गजेंद्र मोक्ष

मृदगंध…

- Advertisment -