Sunday, December 15, 2024
Homeक्राईमPune News : पुणे हादरलं! शाळेतील कर्मचाऱ्याकडून शाळेतील अल्पवयीन मुलींचे अश्लील शोषण

Pune News : पुणे हादरलं! शाळेतील कर्मचाऱ्याकडून शाळेतील अल्पवयीन मुलींचे अश्लील शोषण

पिंपरी : महापालिकेने खासगी संस्थेला चालविण्यास दिलेल्या फुगेवाडीच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील एका कर्मचाऱ्याने अश्लील शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच शाळेतील एका विद्यार्थिनीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी याप्रकरणी भोसरी (दापोडी) पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली असून, सरफराज मन्सूर शेख (वय ३२, रा. कोंढवा पुणे) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने फुगेवाडी परिसरामध्ये असलेल्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे त्या संस्थेतील एका कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केले असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर स्थानिक आमदार महेश लांडगे हे आक्रमक झाले असून त्यांनी दापोडी पोलीस ठाण्यामध्ये तातडीने धाव घेत ‘आरोपींवर कठोर कारवाई करा, अन्यथा आमच्या ताब्यात द्या’, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. मात्र, दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणार असल्याचे त्यांनी आमदार लांडगे यांना सांगितले. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दापोडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देखील दिली आहे.

आरोपी सरफराज मन्सूर शेख हा शाळेतील ॲडमिन विभागात काम करतो. त्याने ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शाळेतील १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना १५ ऑक्टोबर रोजी भेटून शेख याने बॅड टच केल्याचे सांगितले. तसेच माझ्याप्रमाणे १५ वर्षीय एका मुलीबाबत देखील शेख याने असाच प्रकार केल्याचेही पीडित मुलीने मुख्याध्यापकांना सांगितले आहे. त्यानंतर या प्रकारला वाचा फुटली आणि संपूर्ण प्रकरण पुढे आले.

दोनच महिन्यापूर्वी खासगी संस्थेला दिली होती शाळा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दोनच महिन्यांपूर्वी संबंधित इंग्रजी माध्यमिक शाळा एका खासगी संस्थेला चालविण्यास दिली आहे. या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड आणि भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेला दिली आहे. तसेच शाळेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविणे ही जबाबदारी देखील संस्थेची असून, दोनच महिन्यांपूर्वी संस्थेकडे कारभार सोपविला असताना वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

आरोपीवर कठोर कारवाई करावी. ज्यामुळे विकृत प्रवृत्तींना आळा बसेल. नाहीतर आरोपीला आमच्या ताब्यात द्या. मुलींच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी. पीडित मुलींचे कुटुंबीय दबावामध्ये आहेत. शहरात अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी जबर शिक्षा आरोपीला झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. याबाबत संबंधित पोलीस प्रशासनाने कार्यवाही करु असे सांगितले आहे. पोलिसांना आमचे पूर्ण सहकार्य आहे. पण, कोणत्याही जाती-धर्माच्या माता-भगिनींकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, असे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -