Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू!

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू!

नांदेड : नांदेड जिल्ह्यात १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये नांदेड जिल्ह्यात उद्या सकाळी ६ वाजेपासून ते २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

Comments
Add Comment