Wednesday, May 14, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Narendra Modi : बुद्ध धम्माचा खरा अर्थ समजून घ्यायचं असल्यास, पाली भाषेचं ज्ञान आवश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi : बुद्ध धम्माचा खरा अर्थ समजून घ्यायचं असल्यास, पाली भाषेचं ज्ञान आवश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना प्रेम आणि करुणेसह जग समृ्द्ध होतं असं म्हटलं. गेल्या वर्षी कुशीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात मोदींनी सहभाग घेतला होता. नरेंद्र मोदी म्हणाले, भगवान बुद्धासोबत जोडले जाण्याची प्रक्रिया त्यांच्या जन्मासोबत सुरु झालेली आणि आज देखील ती सुरु आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, त्यांचा जन्म गुजरातच्या वडनगरमध्ये झाला आहे, जे एकेकाळी बौद्ध धम्माचं केंद्र होतं. आणि तिथूनचं भगवान बुद्धाच्या धम्म, विचारांबद्दल आणि शिकवणीबद्दल माहिती जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली.


गेल्या १० वर्षांमध्ये भगवान बुद्धांशी संबंधित अनेक पवित्र कार्यात सहभाग घेतला आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हंटल. मग ते नेपाळमध्ये भगवान बुद्धाच्या जन्मस्थळाला भेट देणे, मंगोलियात असणारं भगवान बुद्धाच्या पुतळ्याचं अनावरण करणे, श्रीलंकेतील वैशाख महोत्सवाचं उदाहरण मोदींनी दिलं. संघ आणि साधकाचं मिलन हे भगवान बुद्धाच्या आशीर्वादाचा परिणाम असल्याचं मोदी यांनी म्हंटल. यावेळी मोदींनी शरद पौर्णिमेनिमित्त वाल्मिकी जयंतीचा उल्लेख करत सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.


नरेंद्र मोदी म्हणाले, यंदाचा अभिधम्म दिवस खूप विशेष आहे. पाली भाषेत भगवान बुद्धानं उपदेश केला होता. यावेळी भारत सरकारनं पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं हे भगवान बुद्धांच्या महान कार्याला केलेलं अभिवादन असल्याचं त्यांनी म्हंटलं. धम्माचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर पाली भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. भगवान बुद्धांचा सिद्धांत आणि संदेश मानवाच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्नांची उत्तरं, मानवांसाठी शातीचा मार्ग, शाश्वत शिकवणी, मानवाच्या कल्याणासाठी दृढनिश्चय याप्रकारे दर्शवतो. संपूर्ण जगाला बुद्ध धम्मामुळं प्रेरणा मिळत आहे, असं मोदी म्हणाले.



पाली भाषा जिवंत ठेवण्याची सर्वांची जबाबदारी 


पुढं नरेंद्र मोदी म्हणाले की, दुर्दैव आहे की पाली भाषा आता सर्वसामान्यांच्या वापरात राहिली नाही. भाषा केवळ संवादाचं माध्यम नसते, संस्कृती आणि परंपरेचा आत्मा असते. पाली भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ही जबाबदारी आमच्या सरकारनं विनम्रतेनं पार पाडली आहे. बुद्धाच्या कोट्यवधी अनुयायांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, असं मोदी म्हणाले.





नरेंद्र मोदी म्हणाले एकीकडे पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. आणि दुसरीकडे मराठी भाषेलासुद्धा तो दर्जा दिला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मातृभाषा मराठी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माचे समर्थक होते. त्यांनी पाली भाषेत धम्म दीक्षा घेतली होती. बंगाली, आसामी आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची आठवण नरेंद्र मोदी यांनी सांगितली.


Comments
Add Comment