अलिबाग: निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त वाहनांचा ताफ्यात समावेश नसावा, तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही,असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत.
नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत