Sunday, December 15, 2024
Homeरणसंग्राम २०२४निवडणूकपत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव बंधनकारक

निवडणूकपत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव बंधनकारक

अलिबाग (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ चे कलम १२७-क नुसार कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता नमूद करणे बंधनकारक आहे, अन्यथा कोणतेही पत्रक अथवा भित्तीपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.

निवडणुकीसाठी असणारी पत्रके,छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहेत. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.

निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावी, अन्यथा संबंधित मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुदतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तीफलक असा आहे. या निर्बंधाचे व्यतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल. उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालक यांनी या सुचनांची नोंद घ्यावी, असेही जावळे यांनी कळविले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -