‘असा’ करा अर्ज
मुंबई : सध्या अनेकाजण भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करावा लागणार आहे. तसेच या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. तर २ डिसेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.
कोणत्या पदांसाठी असणार भरती?
बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण ६९० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनियर), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल),तसेच सेकंडरी इंजिनियर ( सिव्हिल), यांत्रिकी आणि विद्युत इंजिनियर (Mechanical And Electrical Engineer) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा आणि वेतन
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या नोकरीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ४१८००० ते १३२३३०० रुपये वेतन मिळणार आहे. तर सेकंडरी इंजिनियर पदासाठी ४४९०० ते १४२४०० रुपये वेतन मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता
सिव्हिल इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजीमध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा केला असावा. तसेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्टशन इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.