Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Gold Silver Price Hike : दिवाळीपूर्वीच सोनं चांदीची उंच झळाळी!

Gold Silver Price Hike : दिवाळीपूर्वीच सोनं चांदीची उंच झळाळी!

जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर?

मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून याकाळात अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. मात्र गेल्या महिना भरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दसरा सणाच्या मुहूर्तावर सोन्याचा दर काहीसा कमी झाला होता. मात्र आता दिवाळीपूर्वी पुन्हा सोन्याचे भाव वाढले असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

२४ कॅरेट सोने

आज १ ग्रॅम सोने ७.८९८ रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६३ हजार १८४ रुपये आहे. १० ग्रॅम म्हणजेच एका तोळ्याची किंमत ७८ हजार ९८० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

१ ग्रॅम सोन्याची किंमत ७,२४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,९२० रुपये आहे तर १० ग्रॅम सोने ७२,४०० रुपयांवर विकले जात आहे. १०० ग्रॅम सोने ७,२४,००० रुपयांवर विकले जात आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

आज १ ग्रॅम सोने ५,९२४ रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४७,३२९ रुपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ५९,२४० रुपये आहे. १०० ग्रॅम सोने ५,९२,४०० रुपयांवर विकले जात आहे.

चांदीची किंमत

आज ८ ग्रॅम चांदीची किंमत ७९२ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९९० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदी ९,९०० रुपयांवर विकली जात आहे. आज चांदीच्या किंमतीत २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment