नवी दिल्ली : दिल्लीमधील प्रदूषण जास्त प्रमाणात वाढल्याने यमुना नदीही प्रदूषित होऊ लागली आहे. कालिंदी कुंजचा हा व्हिडिओ आहे, जिथे पाण्यावर फक्त जास्त प्रमाणात फेस दिसत आहे. संपूर्ण साबणाच्या फेसासारखी दिसते, पण ती प्रत्यक्षात यमुना नदी आहे. पुढच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये छठसारखा मोठा सण आहे. पूर्वांचलमधील लोक मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये राहतात. दिल्ली सरकारनेसुद्धा यावेळी छठ सण खास बनवण्यासाठी विशेष तयारी केली आहे, पण दरम्यान हा व्हिडिओ नक्कीच सर्व तयारीला खाक करून टाकत आहे.
नवीन व्हिडिओमध्ये काय आहे?
आज यमुना नदीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यमुना नदी ही प्रदुषणाने ग्रासलेली असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात तर फक्तच पांढरा फेस पाहायला मिळतो आहे. हे एक बर्फाच्छादित ठिकाण पाहायला मिळतंय, परंतु हे दृश्य दिल्लीमधील कालिंदी कुंजचे आहे. इथल्या प्रदूषणाच्या घटकांमुळे संपूर्ण पाणी विषारी झालं आहे.