Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीByju's बायजू चे नेटवर्थ ढासळले; कंपनीच्या संस्थापकांनी दिली माहिती

Byju’s बायजू चे नेटवर्थ ढासळले; कंपनीच्या संस्थापकांनी दिली माहिती

मुंबई : ‘फाँल इन लव्ह विद लर्निंग’ म्हणत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणा-या बायजू क्लासचे नेटवर्थ शून्यावर येवून ठेपले आहे. गेल्या काही काळापासून ही कंपनी आर्थिक अडचणींना सामोरे जात होती.या शैक्षणिक संस्थेचे ५ मिलियन इतके पेड सबस्क्राईबर आहेत. तसेच ७५ मिलियनपेक्षा अधिक विदयार्थ्यांनी या अँपवर आत्तापर्यंत आपले रेजिस्ट्रेशन केले आहे.मात्र सध्या या कंपनीची आर्थिक परिस्थीती डबघाईला आली आहे.

बायजू कंपनीचे संस्थापक रविंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार Prosus सारख्या गुंतवणूकदारांनी स्टार्टअपमधील त्यांची गुंतवणूक काढून घेतली आहे. रवींद्रन म्हणाले की, गुंतवणूकदारांनी बायजूला खड्डयात ढकलले. राजीनामा देण्याऐवजी त्यांनी बदल किंवा पुनर्रचनेसाठी नियोजन केले असते तर आज कंपनीची अवस्था अशी झाली नसती.दोन वर्षांपूर्वी एडटेक कंपनी बायजूचे मूल्य २२ अब्ज डॉलर्स होते, जे आता शून्य झाले आहे.

दरम्यान, ही कंपनी सुरु राहणार की बंद होणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -