Bihar News : बिहारमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू!

सिवान : बिहारमधील १६ गावांमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत एका महिलेसह ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सिवानमध्ये ३ आणि सारणमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. सिवानमध्ये १४ ऑक्टोबरपासून मृत्यूची मालिका सुरू झाली. सारणमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्वांनी १५ ऑक्टोबर रोजी मद्य प्राशन केले होते. यात ३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिवानमध्ये ५ आणि सारणमध्ये २ जणांची दृष्टी गेल्याचे सांगण्यात येत आहे.


सिवानमध्ये सदर रुग्णालयात ३४ जण दाखल आहेत तर छपरा येथे एकजण दाखल आहे. सारणमधील काही लोकांना पाटणा येथील पीएमसीएचमध्ये पाठवण्यात आले आहे. १३ रोजी सिवानमधील भगवानपूर हाटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅशेत दारू अनेकांनी प्यायली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एएसपी संजय झा यांच्या नेतृत्वाखाली बिहार पोलिसांच्या प्रोहिबिशन युनिटची एसआयटी घटनास्थळी दाखल झाली.

Comments
Add Comment

Share Market Update : जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे; आशियामध्ये संमिश्र व्यवहार

मुंबई : आज जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे दिसत आहेत. मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठा घसरणीसह बंद झाल्या.

Rajnath Singh : भारत भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थीची भूमिका निभावू शकतो - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका यांच्यातील

Fighter Jets Landing : एक्सप्रेस वे वर उतरली लढाऊ विमानं, भारताच्या हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन

सुलतानपूर : उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे पूर्वांचल एक्सप्रेस वे वर भारताची लढाऊ विमानं एकामागून एक या

Kedarnath Mandir : हर हर महादेवच्या गजरात उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार

देहरादून : केदारनाथ धामाचे द्वार आज, बुधवारी सकाळी आठ वाजता शुभ मुहूर्तावर विधी-विधान आणि पूजा-अर्चना करून

Pahalgam Attack : ओल्या जखमेची वर्षपूर्ती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यात शहिदांना वाहिली श्रद्धांजली

पहलगाम : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांनी

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या