Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीYe re ye re Paisa 3 : "ये रे ये रे पैसा...

Ye re ye re Paisa 3 : “ये रे ये रे पैसा ३” नव्या वर्षाची सुरुवात गाजवणार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत ‘ये रे ये रे पैसा’ (Ye re ye re Paisa) मल्टिस्टार चित्रपट आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा सीक्वेल ‘ये रे ये रे पैसा ३’ बहुचर्चित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून नव्या वर्षात ३ जानेवारी २०२५ रोजी ‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अ‍ॅरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. तर, निनाद नंदकुमार बत्तीन वरदविझार्ड एंटरटेन्मेंट हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे.

तर, संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. पंकज पडघन आणि अमितराज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून भेटीस येणार आहे.

संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळं, काहीतही हटके पाहण्याची पर्वणी असते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटानं तो अनुभव दिला आहे. ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा २’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. पैसा मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात भलत्याच गोष्टी घडतात आणि त्यातून होणारी धमाल आता आणखी वेगळी, मनोरंजक होणार आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा तगडा अभिनेता आहे. त्यामुळे मनोरंजनासह सर्वांच्याच कसदार अभिनयाची जुगलबंदीही पाहता येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी ‘ये रे ये रे पैसा ३’ सज्ज होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -