Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीश्री स्वामी समर्थ शिकागोला प्रकटले

श्री स्वामी समर्थ शिकागोला प्रकटले

समर्थ कृपा – विलास खानोलकर

श्री  स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामघोषाचा गजर आता अमेरिकेतही दुमदुमत आहे. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून शिकागो येथील कालीबारी मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या मूर्तीची नुकतीच (३ एप्रिल) प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अमेरिकेत स्वामी समर्थांची ही पहिली मूर्ती आहे.

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे ज्या वटवृक्षाखाली जवळजवळ २२ वर्षे वास्तव्य होते. त्या वटवृक्षाच्या खोडांपासून बनवलेल्या पादुकांची देखील कालीबारी मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी शिकागोच्या कालीबारी मंदिरात खास कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री गायिका डॉ. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या सुमधूर आवाजानं झाली. पद्मजा यांनी श्री समर्थ तारकमंत्र आणि इतर स्वामी भजनांची ऑनलाईन माध्यमातून स्वामींच्या चरणी स्वरपुष्पे वाहिली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे आणि पादुकांचे स्वागत मंदिरातील कलाशारोहण समारंभाने केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीचा अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ४१ कुटुंबांनी स्वामींच्या छोट्या ४१ मूर्तींवर अभिषेक केला.

कालीमाता हे आराध्य दैवत असलेल्या शिकागोच्या कालीबारी मंदिरामध्ये गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या मूर्तीदेखील स्थापित आहेत. त्याबरोबर आता स्वामी समर्थांची मूर्ती देखील स्थापित झाल्याने भक्तांसाठी तीन्ही गुरुंच्या मूर्ती एकत्र असल्याचा दुर्मिळ योग जुळला आहे. या कार्यक्रमाला अमेरिकेतील वेगवेगळ्या भागातून स्वाभीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशा आणि तुतारीच्या गजरांमध्ये श्री स्वामी समर्थांचा पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.

स्वामी कीर्ती सातासमुद्रा पार

स्वामी माझे महाकृपाळू
स्वामी माझे महादयाळू ।।१।।

जेथे जेथे जे जे कमी
तेथे उभे राहती स्वामी ।।२।।

प्रकटदिनी हजर स्वामी
देवळा देवळात स्वामी ।।३।।

घरा घरात स्वामी
मना मनात स्वामी ।।४।।

काश्मीर ते कन्याकुमारी
स्वामी फिरती जगभरी ।।५।।

गिरगाव ते गोरेगाव
अक्कलकोट ते गुरगाव ।।६।।

प्रत्येक प्रसन्न गाव
स्वामींचे गुण गाव ।।७।।

डोंबीवलीचे झाले कल्याण
ऊल्हासनगरचे स्वामींमुळे कल्याण ।।८ ।।

हिमालय नेपाळात पोहोचले स्वामी
शिकागोतही प्रकटले स्वामी ।।९ ।।

स्वामी प्रकट दिनी
भक्त समर्थ अनुदिनी ।।१०।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -