Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीधक्कादायक! बिहारमध्ये विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू

धक्कादायक! बिहारमध्ये विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू

पाटणा : बिहारमधील उत्तर प्रदेशच्या (UP-Bihar) सीमेला लागून असलेल्या सिवान, सारण जिल्ह्यात मंगळवारी रात्री विषारी दारू सेवन (Alcohol Drinking) केल्यामुळे अनेकजणांना विषबाधा (poisoning) झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तपास करता सारण आणि सिवानचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी सर्वांना संशयास्पद शितपेय सेवन केल्यामुळे विषबाधेचा प्रकार घडला असावा अशी माहिती मिळाली.

या घटनेत आतापर्यंत २५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील १० ते १२ दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच विक्रेत्यांकडे दारू किंवा स्पिरीटचा पुरवठा केला जात असण्याबाबत कडक तपासही घेतला जात आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एडीएमच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले आहे. तर राज्यस्तरावरही दारूबंदी विभागाचे पथक देखील या तपासासाठी पोहोचणार आहे. या घटनेत विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची खात्री पटल्यास पुरवठादारास अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सारणचे डीएम अमन समीर आणि सिवानचे जिल्हाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -