बॉलीवूडमधली सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेनं (Radhika Apte) सर्वाना गोड बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांत कलाविश्वातून अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. आता राधिका आपटेच्या घरी पालन हलणार आहे. राधिका आपटे गरोदर आहे. राधिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांना तिच्या या पोस्टने सुखद धक्का मिळाला आहे. राधिका आपटे ३९व्या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
‘बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल २०२४'(BFI London Film Festival) मधील फोटो पोस्ट करत राधिकाने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलंय. राधिकाचे या फिल्म फेस्टिव्हलमध्ये फोटो क्लिक करण्यात आले असून त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतोय.
राधिका ‘सिस्टर मिडनाईट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाच्या प्रिमियरदरम्यान राधिकाने आई होणार असल्याची गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. राधिका या फिल्म फेस्टिव्हलसाठी काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली. मात्र, लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे तिच्या बेबी बंपने. बेबी बंप फ्लॉन्ट करत राधिकाने रेड कार्पेटवर आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.
राधिकाने केलेल्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. २०१२ साली राधिकाने बेनेडिक्ट टेलरशी (Benedict Taylor) लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर आता १२ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.