Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीNayab Singh Saini : हरियाणात पुन्हा ‘नायब’ सरकार! मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा...

Nayab Singh Saini : हरियाणात पुन्हा ‘नायब’ सरकार! मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पडला पार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह १८ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

नवी दिल्ली : हरियाणाच्या (Haryana) मुख्यमंत्रीपदी नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) यांनी आज शपथ घेतली. विशेष म्हणजे ते सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंचकुला येथील सेक्टर ५ मधील दसरा मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) , केंद्रीय मंत्री रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपा- एनडीए शासित १८ राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले आहेत. दरम्यान, नायब सिंह सैनी यांनी गुरुवारी शपथविधी सोहळ्याआधी पंचकुलातील मनसा देवी मंदिरात जाऊन प्रार्थना केली.

कॅबिनेट मंत्रीपदी ‘यांची’ लागली वर्णी

भाजपाचे आमदार कृष्णन लाल पनवार, राव नरबीर सिंह, महिपाल ढांडा आणि विपूल गोयल, अरविंद कुमार शर्मा, श्याम सिंह राणा, रणवीर सिंग गंगवा, कृष्णन बेदी यांनी हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपा आमदार आरती सिंह राव, राजेश नागर, गौरव गौतम यांनीही हरियाणा सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

तीन अपक्षांचा भाजपाला पाठिंबा

हरियाणातील तीन अपक्ष आमदार सावित्री जिंदाल, राजेश जून आणि देवेंद्र कादियान यांनी भाजपा सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -