मुंबई : यंदाच्या पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली आहेत. मात्र तरीही मुंबईकरांना (Mumbai) पाणी कपातीचा (Watershortage) सामना करावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा जलवाहिनीच्या ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. महापालिकेने दुरुस्ती करण्याचे काम सुरु केले असून त्यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबई जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणीपुरवठ्यात घट झाली असल्याने पुढील दोन दिवस मुंबईकरांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५ ते १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.