Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीमंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक

मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक

मुंबई : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात हॅकर्सने आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले आहे. तसेच त्या हॅकर्सने या अकाउंटवरून काही आक्षेपार्ह पोस्टही केल्या आहेत.

आदिती तटकरे यांनी ट्विट करून या सगळ्यांची माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी याबाबत ‘नमस्कार, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व”, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आदिती तटकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आता पोलिसांना हॅकर्सचा शोध घेण्यात यश येतं का? तसेच पोलीस संबंधित आरोपींवर काय कारवाई करतात? ते पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -