Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीRailway Ticket Booking : रिझर्व्हेशन बुकिंगबाबत रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम!

Railway Ticket Booking : रिझर्व्हेशन बुकिंगबाबत रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम!

आरक्षण केंद्रांवर प्रवाशांची उडणार झुंबड!

नवी दिल्ली : गावी जायचं म्हटलं की प्रत्येकजण रेल्वेला पहिली पसंती देतो. उन्हाळी सुट्टी, गणपती, दिवाळी किंवा कोणताही सण असल्यास अनेकजण गावी जातात. मात्र त्यांना चार महिन्याआधीपासूनच तिकीट आरक्षित करावे लागत होते. मात्र आता याच तिकीट बुकिंगबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

रेल्वे मंत्रालयाने तिकीट आरक्षणाबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार यापूर्वी प्रवाशांना चार महिन्यापूर्वी आगाऊ तिकीट बुकिंग करावे लागत होते. मात्र आता नव्या नियमावलीनुसार ६० दिवस म्हणजे दोन महिने आधीच तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) जारी केलेला हा नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.

कोणत्या रेल्वेला नियम लागू नसणार?

तिकीट आरक्षणाचा बदलेला नियम ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस अशा काही दिवसांसाठी चालणाऱ्या गाड्यांसाठी लागू नसणार.

प्रवाशांना फायदा होणार की अडचण?

प्रवाशांना चार महिन्यापूर्वी तिकीट आरक्षित करताना अशावेळी एखाद्याचे तिकीट वेटिंगवर असल्यास ते कन्फर्म होण्यासाठी वेळ लागत होता. मात्र आता प्रवाशांना दोन महिन्यातच तिकीट कन्फर्म होणार ते कळू शकणार आहे.

त्याचबरोबर तिकीट बुकिंगसाठी केवळ दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळे प्रवाशांची तिकीट आरक्षण केंद्रावर एकाचवेळी झुंबड उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -