Tuesday, July 1, 2025

Accident News : मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात

Accident News : मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी राजश्री मुंडे (Rajshree Munde) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. पहाटे ४:३० वाजता कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात जयश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत.


ही दुर्घटना सोरतापवाडी या ठिकाणी घडली, जेथे महामार्गावर कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे अपघात गंभीर झाला. घटनास्थळी तातडीने स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू केले.


राजश्री मुंडे या अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती तपासून त्यांना काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >