Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Nitesh Rane : काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये!

Nitesh Rane : काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये!

आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना फटकारले

मुंबई : संजय राजाराम राऊतसारख्या (Sanjay Raut) बिकाऊ माणसाने भाजपा पक्ष मदारी आणि इतर सर्व माकडं आहेत, असं वक्तव्य करण्याआधी स्वत:च्या बुडाखाली काय आग लागली आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उबाठाला (UBT) एका-एका जागेसाठी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठीवर मुजरे करावे लागतात, नाक रगडायला लागतं तरीही काँग्रेस यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये, असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतवर केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत टीका केली.

त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नाही

दुसऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणं, हिंदुत्व या विषयावर तडजोड करणं, स्वत:ची घरे मोठी करणं या पलीकडे जाऊन संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने म्हणजेच उद्धव ठाकरेने काहीच केलं नाही. त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नसल्यामुळे भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी सरकार आणण्यासाठी व बाळासाहेबांच्या विचारांसाठी केलेला त्याग संजय राऊतसारख्या भ्रष्टाचारी माणसाला कधीच कळणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.

Comments
Add Comment