Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीDA Hike 2024 : कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, सरकारने वाढवला DA, तीन...

DA Hike 2024 : कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, सरकारने वाढवला DA, तीन महिन्यांचा फरकही देणार

दिवाळीच्या सणाआधीच मोदी सरकारने देशातील करोडो कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महागाई भत्ता (डीए) जारी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे, मात्र केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही महागाई भत्ता वाढीचा निर्णय जाहीर होणार आहे. तीन टक्क्यांनी डीएमध्ये वाढ करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.

दरवर्षी केंद्र सरकार जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवते. या वर्षी म्हणजेच २०२४ मध्येही जानेवारीत ४ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता, तर आज झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळेच जुलैपासून महागाई भत्त्यातील वाढ ही तीन टक्के आहे. तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

पगार असा वाढणार

एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४० हजार रुपये असेल आणि त्याच्या डीएमध्ये ३ टक्के वाढ होणार आहे. म्हणजे त्याच्या पगारात १,२०० रुपयांची वाढ होईल. म्हणजे मूळ वेतन, महागाई भत्ता आणि एचआरए जोडण्याआधी त्याचा पगार ६० हजार रुपये होता, तर आता तो ३१,२०० रुपये होईल.

रक्कम किती मिळणार

मूळ पगार ४० हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्याला ३ टक्के डीए वाढ मिळणार आहे. म्हणजे दरमहा १,२०० रुपये अतिरिक्त महागाई भत्ता त्याला मिळणार आहे. जुलैपासूनच ही वाढ लागू मानली जात असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. या प्रकारे त्यांना थकबाकी म्हणून ३,६०० रुपयेही मिळतील.

ऑक्टोंबर महिन्यात किती पगार मिळणार

जुलै महिन्यापासून डीए वाढ लागू केली आहे. ऑक्टोबर महिन्याचे मिळवल्यास चार महिन्यांचा डिओ मिळणार आहे. म्हणजे ४० हजार मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार ६० हजार रुपये होतो. परंतु ऑक्टोबर महिन्यांत चार महिन्यांचा फरक मिळून हा पगार ४८०० रुपये वाढणार आहे. म्हणजे ६४,८०० रुपये पगार ऑक्टोबर महिन्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -