Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर! 'विरोधक थोडे गडबडलेले', महायुतीचा मविआवर हल्लाबोल

महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर! ‘विरोधक थोडे गडबडलेले’, महायुतीचा मविआवर हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर महायुतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या रिपोर्ट कार्डचे (Maha Yuti Report card Maharashtra ) उद्घाटन आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते.

महाविकास आघाडीने तीन दिवसांपूर्वी महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, त्याला महायुतीकडून उत्तर देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, विरोधकांनी आमची टिंगलटवाळी केली, विरोधक गडबडलेले आहेत, ते घाबरले आहेत असं म्हणणार नाही पण गडबडले आहेत, असं अजित पवार म्हणाले. तर ज्यांचा गृहमंत्रीचं जेलमध्ये गेला त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये, असा कडकीचा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला.

महायुतीची पत्रकार परिषद, अजित पवार काय म्हणाले?

आमच्या समोरच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. आमचे महायुतीचे २०२२ ते २०२४ चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. काहींनी महायुती सरकारने तिजोरी मोकळी केली असे आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली. लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली.

काहीही बोलायचं आणि जनतेमध्ये संभ्रम पसरवायचं. दोन पानांचं सुटसुटीत हे रिपोर्ट कार्ड काढले आहे. हा बदलाचा अहवाल आहे. आमच्या मेहनतीचा हा लेखाजोखा आहे.

आमचे विरोधक थोडे गडबडलेले आहेत. घाबरलेत असं म्हणणार नाही, पण गडबडलेले नक्कीच आहेत.

महायुतीचा मविआवर धारधार शब्दांचा हल्लाबोल-

– निवडणुकीचा शंखनाद झालाय
– आमच्यासाठी शंखनाद झालाय तर इतरांसाठी ऐलान झालंय
– आम्ही संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आज मांडत आहोत
– स्थगिती सरकार गेल्यावर गती आणि प्रगतीचे सरकार राज्याने पाहिले
– मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात परिवर्तनशील योजना महाराष्ट्रात आणल्या गेल्या
– शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
– महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज मिळणार आहे याचं काम सुरू आहे
– साडेआठ रुपये दराने मिळणारी वीज तीन रुपये दराने मिळणार आहे
– वीजबिल माफीचा निर्णय विचार करूनच घेण्यात आला आहे

– मविआ काळात एकाही प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळाली नव्हती
– आम्ही १४५ प्रकल्पांना सुधारित मान्यता दिल्याने २२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे
– वैनगंगा, नळगंगा, नदीजोड प्रकल्प मंजूर करून ५५ टीएमसी पाण्याचा प्रश्न निकाली काढून मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे
– सिंचन क्षेत्रात भरपूर काम केलंय
– होमगार्डच्या वेतनात भरघोस वाढ करून दिली
– वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळे तयार करून न्याय देण्याचा प्रयत्न
– उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की आम्ही महायुतीच्या सगळ्या योजना बंद करू, स्थगिती सरकार आणून महाराष्ट्राला कुलूपबंद करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १ लाख तरुणांना उद्योजक बनविले
– पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही महामंडळ करून आम्ही विचार केला

– विरोधी पक्ष पूर्णतः कन्फ्युज आहे
– नव्या योजना आणू म्हणणाऱ्या विरोधकांचा पर्दाफाश झाला आहे
– लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस नेते कोर्टात गेले पण तसं झालं नाही
– उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवणारे आम्हाला कायदा सुव्यवस्थेबाबत सांगत आहेत
– आरोपींना कोरोना काळात गाड्या उपलब्ध करुन देणारे आज कायद्यावर बोलत आहेत
– निर्भया पथकाच्या गाड्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या
– केवळ नरेटिव्ह तयार करणे विरोधकांचा प्रयत्न
– विरोधक हेच गुजरातचे Brand Ambassador
– महाराष्ट्र पुढे आहे आणि पुढेही महाराष्ट्रच पुढे राहील
– जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल
– उर्वरीत कामे आम्ही पुढील पाच वर्षात पूर्ण करू

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -