Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Garlic Price Hike : परतीच्या पावसाचा फटका! आणखी काही दिवस सोसावी लागणार लसणाची महागडी फोडणी

Garlic Price Hike : परतीच्या पावसाचा फटका! आणखी काही दिवस सोसावी लागणार लसणाची महागडी फोडणी

सोलापूर : वरण किंवा कोणतीही भाजी करायची झाली की, जिरे- मोहरी आणि लसूण आवश्यक असते. जेवणात लसणाची खमंग फोडणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे लसणाची मागणी नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. मात्र मागील महिनाभरात लसणाची आवक घटल्याने १०० ते १३० रुपये किलो दरात मिळणारा लसूण तब्बल ३५० रुपये किलोवर पोचला आहे. दरम्यान, पाऊस ओसरल्यानंतर लसणाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अजूनही काही दिवस सर्वसामान्यांना लसणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे लसूण लागवड विलंबाने झाली असून तो लसूण बाजारात यायला आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. तर खराब हवामानामुळेही अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे नुकसान आणि ग्राहकांची मागणी पाहता आणखी काही दिवस लसणाची फोडणी महागच असणार आहे.


दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला असून रब्बी पेरणीची तयारी व कांदा लागवडमुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड होत आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवार, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment