Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीAkshay Kumar : 'हिरोगिरी फू फू करने में नही...'अक्षय कुमारची ही जाहिरात...

Akshay Kumar : ‘हिरोगिरी फू फू करने में नही…’अक्षय कुमारची ही जाहिरात होणार बंद!

सेन्सॉर बोर्डाने दिले आदेश; नेमकं कारण काय?

मुंबई : सहा वर्षांपूर्वी अक्षय कुमारची (Akshay Kumar) ‘हिरोगिरी फू फू करने में नहीं..’ ही जाहिरात सर्वत्र प्रदर्शित करण्यात आली होती. सर्व टिव्ही माध्यमांसह अनेक चित्रपटगृहातही ही जाहिरात दाखवण्यात येत होती. परंतु सेन्सॉर बोर्डाने आता ही जाहिरात हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ साली ‘हिरोगिरी फू फू करने में नहीं.. असं म्हणत हॉस्पिटलबाहेर सिगारेट फुंकत उभारलेला नंदू आणि सायकलवरून येणाऱ्या अक्षय कुमार त्याला धुम्रपानापासून थांबवतो (Smoking is injurious) आणि महिलांच्या मासिक पाळीसाठी लागणारे सॅनिटरी पॅड हातात देतो. मासिक पाळीत घाणेरडे कपडे वापरल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी तो महिलांना पॅड खरेदी करण्याचा सल्ला नंदूला देत असतो’, अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र सध्या या जाहिरातीच्या आधारे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मिम्स व्हायरल होत असल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने ही जाहिरात काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान, ही जाहिरात काढून तंबाखू, धुम्रपान करणं हानीकारक असल्याचे सांगणारी एक नवी जाहिरात येणार असल्याचीमाहिती मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -