Sunday, May 25, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Bhoolbhulaiyaa 3 : भूलभुलैया ३'चं पहिलं गाणं रिलीज; रॅपर पिटबुल व दिलजीत दोसांझचा धुमाकूळ!

Bhoolbhulaiyaa 3 : भूलभुलैया ३'चं पहिलं गाणं रिलीज; रॅपर पिटबुल व दिलजीत दोसांझचा धुमाकूळ!

मुंबई : यंदाचे हे वर्ष हॉरर कॉमेडी चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट ठरले आहे. दोन महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सध्या सर्वत्र ‘भूल भुलैया ३’ (bhoolbhulaiyaa 3) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), विद्या बालन(vidya balan), तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आज या चित्रपटातील पहिले गाणे सर्वत्र रिलीज झाले आहे.



काय आहे या गाण्याची खासीयत ?


या गाण्यात अमेरिकन रॅपर पिटबुल आणि दिलजीत दोसांझ पहिल्यांदाच एकत्र गायले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना पंजाबी गाण्यावरती आणि आंतरराष्ट्रीय बीट्सवर एकाचवेळी थीरकता येणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भुल भुलैया ३ हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच हा चित्रपट स्त्री २ पेक्षाही वरचढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)




Comments
Add Comment