Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai Fire : अंधेरीत अग्नितांडव! लोखंडवाला परिसरातील इमारतीला भीषण आग

Mumbai Fire : अंधेरीत अग्नितांडव! लोखंडवाला परिसरातील इमारतीला भीषण आग

तिघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची शक्यता

मुंबई : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली होती. मुंबईतील आगीचे प्रकरण ज्वलंत असताना आता मुंबईतल्या अंधेरीतील लोखंडवाला (Lokhandwala) परिसरात एका इमारतीला भीषण आग (Fire News) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लोखंडवाला परिसरातील एका इमारतीत दहाव्या मजल्यावरील एका घरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे या आगीत घरात राहणारे दोन वृद्ध आणि घरातील नोकराचा मृत्यू झाला.

दरम्याम, या आगीत काही जण अडक्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. परंतु पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment