Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी; चित्रा वाघ, पंकज भुजबळ, हेमंत पाटील यांच्यासह ७...

राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी; चित्रा वाघ, पंकज भुजबळ, हेमंत पाटील यांच्यासह ७ जणांनी घेतली शपथ

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची मंगळवारी शपथ घेतली. भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे.

तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना संधी मिळाली आहे.

तर शिवसेनेने हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे यांची वर्णी लागली आहे. या सर्वांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

महंत बाबूसिंग महाराज हे बंजारा समाजाचे धर्मगुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी पोहरादेवीचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांना सगळी माहिती देण्याचे काम बाबूसिंग महाराज यांनी केले होते. पंकज भुजबळ हे २००९ आणि २०१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधून विधानसभेवर गेले होते. २०१९ मध्ये मात्र त्यांना हॅट्रीक साधता आली नाही.

शिवसेनेचे सुहास कांदे यांनी त्यांचा पराभव केला होता. माजी खासदार हेमंत पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली महायुती सरकारकडून केल्या जात होत्या. त्यानंतर शासनाने माजी खासदार पाटील यांना मंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे.

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदावर असेपर्यंत त्यांचा मंत्री पदाचा दर्जा राहणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -