Tuesday, September 16, 2025

मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, रुग्णालयात दाखल

मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, रुग्णालयात दाखल

अहिल्यानगर : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटेच्या सुमारास मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा (Brainstroke) झटका बसला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला. मधुकरराव पिचड यांचे वय ८४ आहे. नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती स्थित असल्याची माहिती मिळत आहे. मधुकरराव पिचड यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.

शरद पवारांची काही दिवसांपूर्वी घेतली होती भेट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली होती. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. पण, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची बोलले जात आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. किरण लहामटे यांनी २०१९ मध्ये वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यांना अकोले विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा