मुंबई : महाविकास आघाडीची काल संयुक्त पत्रकार परिषद पार पडल्यानंतर आता महायुतीकडून सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बिगुल उद्याच (१५ ऑक्टोबर) वाजण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर महायुतीची सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
या पत्रकार परिषदेतून कोणती माहिती दिली जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक लक्षात घेता महायुतीकडून शासन निर्णयांचा धडाकाच लावण्यात आला आहे. जवळपास साडेबाराशेच्या आसपास शासकीय निर्णय घेण्यात आले आहेत. जवळपास सर्वच घटकांना खुश करून टाकण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून करण्यात आला आहे. उद्या दुपारी अडीच वाजता एमसीए सभागृहात पत्रकार परिषद होणार आहे.