Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! दिवाळीपूर्वी ३ हजार रुपयांसह लाभार्थींना मिळणार २,५०० अतिरिक्त रक्कम

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! दिवाळीपूर्वी ३ हजार रुपयांसह लाभार्थींना मिळणार २,५०० अतिरिक्त रक्कम

मुंबई : महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या अंतर्गत महिलांना दरमहा १५००रुपये देण्यात येत आहेत. नुकतेच काही महिलांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच ३ हजार रुपयांचा बोनस जारी केला. तसेच काही लाभार्थी महिलांना २ हजार ५०० रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे. पाहा कोणत्या महिलांना होणार याचा लाभ.

कोणत्या महिलांना मिळणार अतिरिक्त रक्कम?

सरकारने ३ हजार रुपयांच्या बोनसशिवाय काही निवडक महिलांना २ हजार ५०० रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. हा अतिरिक्त लाभ दिव्यांग महिला, एकल माता, बेरोजगार महिला, दारिद्ररेषेखालील महिला, आदिवासी भागातील महिला या महिला वर्गासाठी उपलब्ध असणार आहे.

Comments
Add Comment