Tuesday, June 24, 2025

बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी चौथ्या संशयिताला अटक

बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी चौथ्या संशयिताला अटक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी हरिशकुमार बालकराम (वय २३) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हरिशकुमार हा बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला चौथा संशयित आहे.


हरीशकुमार बालकराम हा पुण्यात स्क्रॅप डीलर म्हणून काम करत होता. त्याला उत्तर प्रदेशातील बहराइचमधून पैशांचा पुरवठा आणि लॉजिस्टिक्सची व्यवस्था केल्याबद्दल अटक केली आहे. बाबा सिद्दिकी यांची वांद्र्यात खेरवाडी सिग्नलवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.


सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी ते लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी रविवारी रात्री उशिरा पुण्यातून प्रवीण लोणकर याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment