Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीElection Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद; विधानसभा निवडणुकीच्या...

Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद; विधानसभा निवडणुकीच्या तारखा होणार जाहीर

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांसह सर्वांना उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोग (Election Commission) दुपारी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यासोबत आचारसंहितेची सुद्धा या पत्रकार परिषदेद्वारे घोषणा करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता होणा-या या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे घेणार सदस्यत्वाची शपथ

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील. विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल.

त्याचबरोबर श्रीमती चित्रा किशोर वाघ, श्री विक्रांत पाटील, श्री धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्री पंकज छगन भुजबळ, श्री इद्रिस इलियास नाईकवाडी, श्री हेमंत श्रीराम पाटील, डॉ श्रीमती मनीषा कायंदे हे नामनियुक्त सन्माननीय सदस्य देखील शपथ घेणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -