Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Assembly Election 2024 : येत्या २४ तासात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता!

Assembly Election 2024 : येत्या २४ तासात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता!

मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार तसेच आचारसंहिता (Code Of Conduct) कधीपासून लागणार याबाबतची चर्चा सुरु असताना राजकीय रिंगणातून मोठी बातमी समोर येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारबाबात महत्त्वाचे निर्णय मांडण्यात येणार असून येत्या २४ तासांत कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.



कोणत्याही क्षणी आचारसंहिता जारी


१० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान तर, २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान मतमोजणी होऊ शकते. २६ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार आज किंवा उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागली जाऊ शकते, असे वक्तव्य राज्यातील काही नेत्यांनी केले आहे.

Comments
Add Comment