दिल्लीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बाँब असल्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली, त्यांनतर एअर इंडियाच्या विमानाचे दिल्लीत इमर्जन्ससी लँडिग करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर बचाव पथकाने विमानाची झाडाझडती घेतली, मात्र कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
सोमवारी सकाळी दिल्लीच्या IGI विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर हे लँडिंग करण्यात आले. मुंबईहून न्यूयॉर्कला हे विमान जात होते. एअर इंडियाचे विमान सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने दिल्लीकडे वळवण्यात आले. विमान सध्या दिल्ली विमानतळावर असून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जात आहे.
एअर इंडियाकडून निवेदन..
एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘१४ ऑक्टोबर रोजी मुंबईहून JFK ला उड्डाण करणारे विमान AI119 ला विशेष सुरक्षा इशारा मिळाला आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार ते दिल्लीकडे वळवण्यात आले. सर्व प्रवासी उतरले असून दिल्ली विमानतळ टर्मिनलवर आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मैदानावरील आमचे सहकारी आहेत ते प्रयत्न करत आहेत. एअर इंडिया आपल्या प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य देते.
Flight AI119 operating from Mumbai to JFK on October 14 received a specific security alert and on instructions of the government’s security regulatory committee was diverted to Delhi. All passengers have disembarked and are at the Delhi airport terminal: Air India Spokesperson https://t.co/x9scGAXPM5 pic.twitter.com/p1L5Qt6yWu
— ANI (@ANI) October 14, 2024
दरम्यान, गेल्या महिन्यातसुद्धा मुंबईहून आलेल्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानाच्या वॉशरूममध्ये टिश्यू पेपरवर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचे लिहिलेले आढळून आले. यानंतर तातडीने कारवाई करून नंतर लँडिंग करण्यात आले.