Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीIsrael Hezbollah War : इस्रायलवर हिजबुल्लाहचा भयंकर हल्ला!

Israel Hezbollah War : इस्रायलवर हिजबुल्लाहचा भयंकर हल्ला!

४ सैनिक ठार, ६० हून अधिक गंभीर जखमी

लेबनॉन : लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर मोठा हल्ला (Israel Hezbollah War) केला आहे. हल्ल्यात इस्रायली लष्कराचे (Israeli Army) चार सैनिक ठार झाले असून ६० हून अधिक सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. हिजबुल्लाहने सुसाईड ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हा हल्ला केला आहे, ज्यामुळे इस्रायलच्या उत्तरेकडील सैनिकी तळाला मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात तणाव वाढत आहे. इस्रायलने हिजबुल्लाच्या नेटवर्कवर पेजर, वॉकीटॉकी आक्रमण करून तोडफोड केली होती. याशिवाय, इस्रायलने हिजबुल्लाच्या एका प्रमुख नेत्याला देखील ठार केले होते. या प्रतिहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, हिजबुल्लाहने प्रत्युत्तरात ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले आहेत.

ताज्या हल्ल्यात इस्रायलच्या बिन्यामिनामध्ये असलेल्या सैनिकी तळावर लक्ष्य साधण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलमधील हैफा शहरालाही २५ हून अधिक रॉकेट आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला अचानक घडल्याने कोणताही पूर्व इशारा देणारा सायरन वाजवला गेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी रात्री इस्रायलच्या उत्तरेकडील परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.या हल्ल्यामुळे इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष आणखी उग्र झाला आहे. दोन्ही देशांमध्ये वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने या संघर्षात मध्यस्थी करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -