Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Cabinet Meeting : महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; घेतले 'हे' महत्त्वाचे १९ निर्णय!

Cabinet Meeting : महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; घेतले 'हे' महत्त्वाचे १९ निर्णय!

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नेतेमंडळींकडून जय्यत तयारी सुरु आहे. अशातच कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते अशा चर्चा सुरु असताना आज सकाळी महायुती सरकारने (Mahayuti) शेवटची बैठक आयोजित केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. जाणून घ्या कोणते आहेत ते निर्णय.




  • मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री १२ वाजेपासून अंमलबजावणी.

  • आगरी समाजासाठी महामंडळ

  • समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

  • दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

  • आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

  • वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

  • राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

  • पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

  • खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

  • राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

  • पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

  • किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

  • अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

  • मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

  • खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

  • मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

  • अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

  • ‘उमेद’साठी अभ्यासगट

  • कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव.

Comments
Add Comment