सुदैवानी जीवितहानी टळली
नवी मुंबई : नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७ व्या मजल्यावर अचानक आग (Navi Mumbai Fire) लागली. काही क्षणातच या भीषण आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सर्वात उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या नेरुळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्स मधील ४७ व्या इमारतीच्या १७ व्या मल्यावरील सदनिकेला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. सकाळी नऊच्या सुमारास आग आटोक्यात असून आसपासच्या सदनिका रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही भीषण आगीत घर जळून गेले आहेत. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.