Wednesday, January 22, 2025
Homeताज्या घडामोडीमहायुतीचा क्रांतीकारी निर्णय; मुंबईकरांना टोलमाफी

महायुतीचा क्रांतीकारी निर्णय; मुंबईकरांना टोलमाफी

आज रात्री १२ वाजल्यापासून होणार अंमलबजावणी

मुख्यमंत्र्यांची राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठी घोषणा

मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वेध लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा (Toll Free) निर्णय घेतला आहे. वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर आणि ठाणे येथील टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्री १२ वाजल्यापासून याबाबतची अंमलबजावणी होणार असून सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

दहिसर, मुलुंड पश्चिम (एलबीएस रोड), वाशी, ऐरोली आणि मुलुंड पूर्व टोल बूथवर हलक्या वाहनांची टोलवसुली बंद
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहीता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी राज्य मंत्रिमंळाची झालेली बैठक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकारने या बैठकीत मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील हलक्या वाहनांना पूर्णपणे टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून होणार आहे. या निर्णयामुळे दहिसर, मुलुंड पश्चिम (एलबीएस रोड), वाशी, ऐरोली आणि मुलुंड पूर्व टोल बूथवरील हलक्या मोटार वाहनांकडून रात्री बारापासून टोलवसुली बंद करण्यात येईल.

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली होती. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोलनाके उभारण्यात आले होते. पूल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी सन १९९९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर २००२ मध्ये पाचही टोलनाके कार्यान्वित करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू केली होती.

वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांचा टोल ४५ रुपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली होती. सन २००० पासून, मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. शहरातील उड्डाणपुलांच्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई मधले टोल माफी करण्यात यावी यासाठी वारंवार मनसेकडून आंदोलने करण्यात येत होती. अनेक वेळा राज ठाकरे यांनी आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे देखील या संदर्भात भेट घेतली होती. आता अखेर निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांची टोलच्या जाचातून मुक्तता झाली.

मुंबईकरांना मिळाला दिलासा

टोल माफीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी ४५ आणि ७५ रुपये अशी आकारणी केली जात होती. २०२६ पर्यंत टोलची मुदत होती. भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता होती. सरकारच्या निर्णयामुळे २ लाख ८०००० वाहनांना दिलासा मिळेल. जो आर्थिक भार पडणार आहे याबाबत सरकारने निर्णय घे्ताना सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. याबाबत सरकार प्रतिपूर्ती करेल, असे मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत, या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचे पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचे काय झाले?’ असे कोणी विचारले तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचे उदाहरण अभिमानाने सांगा. – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -