मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे अफूचा मोठा साठा यशस्वीरित्या जप्त (opium seized) केला. या टोल नाक्यावर अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची ओळख पटवण्यात आली. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, १९८५ च्या तरतुदीनुसार एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात वाहनाची कसून झडती घेतल्यानंतर ९,६९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आला. राष्ट्रीय औषध कायदा अंमलबजावणी विभागाच्या अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या (NDPS) फील्ड टेस्ट किटच्या चाचणीद्वारे या पदार्थाची पुष्टी करण्यात आली.
तपासाचा एक भाग म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या अंमली पदार्थाचा मुंबईतील प्राप्तकर्ता आणि रतलाममधील पुरवठादार या पुरवठा साखळीत सामील असलेल्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये अफूची बेकायदेशीररीत्या लागवड करणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.