Sunday, January 19, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलकांदा कापताना डोळ्यांत पाणी का येते?

कांदा कापताना डोळ्यांत पाणी का येते?

कथा – प्रा. देवबा पाटील 

त्या दिवशी आईची स्वयंपाकाची कणीक मळून झाली होती. आईने कणकेचा एक सुंदर मोठा गोळा तयार केला व त्या परातीत ठेवून ती परात बाजूला केली. उठून हात धुतले व पुन्हा येऊन जयश्रीजवळ जाऊन बसली. आता तिने एक कांदा व विळा हाती घेतला नि कांदा कापण्यास सुरुवात केली. कांदा थोडासा कापून होतो न होतो तोच आईच्या व जयश्रीच्या ही नाका-डोळ्यांतून पाणी यायला लागले.
जयश्री रुमालाने नाक व डोळे पुसत म्हणाली, “आई असा कांदा कापल्याने आपल्या नाक व डोळ्यांतून पाणी कसे काय येते गं?”

आई सांगू लागली, “डोळे हे आपले महत्त्वाचे इंद्रिय आहे. आपल्या डोळ्यांद्वारे दिसणा­ऱ्या सर्व दृश्यांचे पृथक्करण व वर्गीकरण करून त्यानुसार मेंदू आपल्या शरीराच्या सा­ऱ्या क्रिया-प्रतिक्रिया करीत असतो, सारे साद-प्रतिसाद सांभाळत असतो. मनातील सर्व भावभावना प्रकट करण्यासाठी डोळे हेच प्रभावी माध्यम असते. असे हे डोळे स्वच्छ व निकोप ठेवण्यासाठी निसर्गानेच पुरेपूर नीट व्यवस्था केलेली असते. आपल्या डोळ्याच्या संरक्षणासाठी डोळ्याच्या वरखाली अशा दोन पापण्या असतात. पापण्यांना अनेक बारीक स्नायू असतात. त्यांच्या साहाय्याने पापण्यांची सतत उघडझाप होते. ही एक अनैच्छिक क्रिया आहे. डोळ्यांत पापण्यांच्या खाली अश्रुपिंड किंवा अश्रुग्रंथी असतात. पापण्यांची सतत उघडझाप होताना प्रत्येकवेळी या अश्रुपिंडांवर थोडासा दाब पडतो व अश्रुग्रंथींमधून जो द्रव स्त्रवतो त्यालाच अश्रू असे म्हणतात. समजले जयू बेटा?” आईने जयश्रीची जागरूकता तपासली.

“हो आई, समजून तर राहिले पण कांदा…” जयश्री बोलत असतानाच आई तिचे वाक्य मध्येच तोडत पुढे बोलू लागली, “कापलेला कांदा, करी नाका-डोळ्यांचा वांधा. कांद्यामध्ये अमोनियाचे संयुग असते. कांदा कापल्यानंतर या संयुगातून अमोनिया हा वायू बाहेर पडतो. त्याला उग्र व झिणझिण्या आणणारा वास असतो. तो वायू नाका-डोळ्यांत जातो व डोळ्यांना, नाकातील त्वचेला झोंबतो. त्यामुळे नाकातील मृदू त्वचेची व आपल्या नाजूक डोळ्यांची खूप जळजळ होते. ही संवेदना जेव्हा मेंदूला पोहोचते तेव्हा ती जळजळ थंड करण्यासाठी मेंदू ताबडतोब अश्रुग्रंथींमधून भरपूर अश्रू निर्माण करतो व अश्रूंची बरसात करतो. डोळे व नाकातून हे अश्रू वाहतात म्हणजेच नाका-डोळ्यांतून पाणी येते व ती जळजळ शांत होते.”
“कांदा कापल्यावर त्याला तू पाण्यात का टाकते आई?” जयश्रीने विचारले.
“कांद्यातील हा अमोनिया पाण्यात विरघळतो म्हणून कांदा कापल्यानंतर जेवणासोबत तोंडी लावण्याआधी त्याला पाण्यात टाकतात.” आईने उत्तर दिले.

“तिखट खाल्ल्याने व धुरामुळेसुद्धा डोळ्यांतून का पाणी येते मग?” जयश्री बोलली.
आई म्हणाली, “धुरामुळेसुद्धा डोळ्यांचा दाह होतो, तेव्हाही तो दाह थंडा होण्यासाठी असेच डोळ्यांतून पाणी येते. झणझणीत तिखट खाल्ले किंवा मिरची खाल्ली नि ठसका लागला अथवा शिंका आल्या तरीसुद्धा पापण्यांच्या नसांवर दाब येतो व अश्रुग्रंथींवर जास्त दाब पडून अश्रुपिंडांमधून म्हणजेच डोळ्यांतून जास्तीचे पाणी येते. असे कांद्यामुळे, धुराने, तिखटाने डोळ्यांतून अश्रू येणे ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे.” “पण त्या अश्रूंचा आपल्या डोळ्यांना काही फायदा होतो का गं आई?” जयश्रीने रास्त प्रश्न केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -