ठाणे : ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. अशातच मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यांत प्रवाशांसाठी मेट्रोसेवा (Thane Metro) दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शहरांमधील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. त्यानंतर आता अनेक वर्षापासून मेट्रोचे स्वप्न बघणाऱ्या ठाणेकरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. लवकरच याबाबतचे काम सुरु होणार असून येत्या पाच वर्षात ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे वैशिष्टय?
ठाण्यातील मेट्रो प्रकल्प हा २९ किमी लांबीचा असून हा मार्ग हा उन्नत असून ३ किमीची मार्ग हा भूमिगत असणार आहे. यामध्ये २२ स्थानकांचा समावेश असणार आहे. यात मुंलुड आणि ठाण्याच्या मध्ये होऊ घातलेल्या नवीन ठाणे स्टेशनला देखील अंतर्गत मेट्रोचे स्थानक जोडले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.