Sunday, October 26, 2025
Happy Diwali

सोलापूर तुळजापूर मार्ग उद्या रात्रीपासून चार दिवस बंद; 'असे' असतील पर्यायी मार्ग!

सोलापूर तुळजापूर मार्ग उद्या रात्रीपासून चार दिवस बंद; 'असे' असतील पर्यायी मार्ग!

सोलापूर : कोजागिरी पोर्णिमा (Sharad Purnima) आणि मंदीर पोर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या (Tuljabhavani Devi) दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूर कडे पायी चालत येतात. मात्र सदर मार्गावर जाणाऱ्या वाहनांमुळे पायी दर्शनाकरीता तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना अडथळा, गैरसोय व अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाकडून उद्यापासून पुढील चर दिवस सोलापूर ते तुळजापूर मार्गावर वाहनांसाठी बंद ठेवण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात येत असून पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग सुद्धा दिले आहेत.

काय आहेत पर्यायी मार्ग?

सोलापूर तुळजापूर मार्ग सोमवार रात्रीपासून चार दिवस बंद राहणार असल्यामुळे सोलापूर ते तुळजापूर या मार्गाने जाणारी वाहतूक सोलापूर ते तांदुळवाडी खानापुर ते तुळजापूर अशी वळविण्यात आली आहे.

Comments
Add Comment