पुणे : तरुणाचा खून करुन एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये मृतदेह ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी खूनाचा हा प्रकार उघडकीस आणला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत त्याचा चुलत भाऊ आसीफ महेबुब पटेल (वय २९, रा. थेऊर फाटा, लोणी काळभोर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील हिंगणे मळा विसर्जन घाटावर एक कचरा वेचक मुलगा कचर्यातून काही वस्तू मिळताहेत का याची पाहणी करत होता. त्याला कचर्यात एक पुठ्ठ्याचा बॉक्स दिसून आला. तो जड लागत असल्याने त्याने तेथेच तो उघडला. तेव्हा त्यात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. कचर्यात मृतदेह आढळून आल्याचे समजताच अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील , पोलीस उपायुक्त आर राजा , सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट दिली.