मुरुड : मुरुड तालुक्यातील खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरी आढळून आलेा. त्या पाचफुटी नागाला सर्पमित्र संदीप यांनी वनविभागाचे अधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने जीवदान दिले आहे. त्यामुळे सर्पमित्र संदीप घरत यांची सर्वत्र गोड कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरामध्ये साप आढळून येताच घबराट पसरली होती. त्यांनी तातडीने वनविभागाचे वनपाल किरण गायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने सर्पमित्र संदीप यांना भ्रमणध्वनीद्वारे खबर दिली. माहिती मिळताच संदीप घरत यांनी खारआंबोली येथील संदीप ठाकूर यांच्या घरी येऊन पाच फुटी नागाला आपल्या कौशल्याने पकडून वनअधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जीवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.