पाहा कोणती आहे नेमकी कंपनी?
मुंबई : नवरात्रोत्सव संपला असून आता लवकरच दिवाळी (Diwali) सणाला सुरुवात होणार आहे. या दिवाळीत अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) म्हणून विविध भेटवस्तूसह अधिकचा पगार देखील मिळतो. मात्र एका कंपनीने ऑफिस कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि बाईक दिवाळी बोनस म्हणून दिली आहे. यामुळे सर्वत्र याच कंपनीची चर्चा सुरु आहे. जाणून घ्या कोणती आहे ही कंपनी.
मिळालेल्या माहितीनुसार, स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि डिटेलिंग कंपनी टीम डिटेलिंग सोलूशन्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच २८ कार आणि २९ बाइक गिफ्ट केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अधिक प्रोत्साहित करतील, म्हणून कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट देण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी केलेली मेहनत पाहता त्यांना हुंडाय, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंजसारख्या विविध कंपन्यांच्या कार भेट म्हणून दिली आहे. सध्या कंपनीत कर्मचारी असून काही कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक दिली आहे. तर इतर कर्माऱ्यांना विविद भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.