मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे राजकीय नेत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) जवळचे मित्र होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी ऐकताच सलमान खानला अश्रू अनावर झाले आणि त्याने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी सलमान खानचे डोळे पाणावले होते. आपला जवळचा मित्र गमावल्याच दु:ख सलमान खानच्या चेहऱ्यावर दिसत होत.
या घटनेनंतर सलमान खानने बिग बॉस १८ चं शूटही रद्द केल्याची माहितीही समोर येत आहे. एकेकाळी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात वैर होते. पण बाबा सिद्दीकी यांनीच सलमान व शाहरुख खानमधील हे वैर संपवले. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टी यांच्यासह बॉलिवूडमधील इतर अनेक बड्या सेलिब्रिटींना आमंत्रित केल जायचं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी मिळताच शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत लिलावती रुग्णालयात पोहोचली. यावेळी शिल्पाला देखील अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळतंय.