खोपोली : विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) केव्हाही जाहीर होऊ शकते याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाने मोठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) या नेतृत्वावर प्रभावित होत विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी – कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील तरुणाई शिंदे गट शिवसेनेत (Shinde Shivsena) पक्ष प्रवेश करत आहे.
खालापुर तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देवन्हावे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी ॲड.जयेश तावडे यांच्या पुढाकाराखाली शिंदे गट शिवसेनेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थिती तांबाटी येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पक्षप्रवेश केला आहे. तर सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील आपल्याला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, संपर्कप्रमुख विजय पाटील, शिवसेना नेते हनुमंत पिंगळे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक-युवासैनिक उपस्थित होते.